दुसऱ्याला दोष देणे सोपे असते, पण आपले दोष दाखवले की अहंकार जागा होतो.
हे तुमच्या विषयी जास्त लागू होते आहे असे वाटते. संजोप राव आणि इतर मनोगतींनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करा.. अथवा 'भारतात गेल्यावर ह्या गोष्टीचा काय तो सोक्षमोक्ष लावेन तो पर्यंत आपले मत राखून ठेवेन' असे कबूल तरी करा. एकलव्याने म्हटल्या प्रमाणे, तोवर -- आणि नंतरही पक्की खात्री पटेपर्यंत हे सगळी थापेबाजीच वाटणार.
तुम्ही नास्तिक आहात तर, तुमचे विचार दुसऱ्यांवर लादू नका.
तुम्ही आस्तिक आहात तर तुमचेही विचार दुसऱ्यांवर लादू नका.
तुमचीच काही वाक्ये पाहा...
"देवाचा न्याय समजण्याची आपली लायकी असावी लागते..."
"ह्या प्रवृत्तींचे राक्षस ह्या जगाला नवीन नाहीत..."
असो ..आस्तिक नास्तिक ह्या वादात न पडता तूर्तास 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' ह्या नावाने पुरावे फेका नाही तर बाकीच्यांचे म्हणणे मान्य करा.
ज्या हिरीरीने आपण वाद घालत आहात की, असे नसेलच कशावरून त्याच उत्साहाने थोडा,असे असेलच कशावरुन? असाही विचार जमलं तर करून बघा!