मला वाटते आपण सैनिकांचे फाजील उदात्तीकरण करतो. सैन्य हे एक नेसेसरी इव्हिल आहे. सैन्य हे संरक्षणाकरता आहे. त्यात प्रतिभेला, नवनिर्मितीला फारसा वाव नाही. एक उत्तम सैनिक हा वरिष्ठांची आज्ञा मानणारा, कष्टाळू, टणक माणूस असतो. पण मला वाटते त्यापेक्षा समाजात कल्पक लोकांची जास्त गरज आहे. एखादा शेतकरी जो नापीक मानलेल्या जमिनीत नवे पीक घेतो, एखादा जो ओसाड भागात पाणी अडवून शेती करतो तो माझ्या मते जास्त विधायक काम करतो. त्याने समाज खरोखर पुढे जातो. एखादा उत्तम शिक्षक, कुशल यंत्रज्ञ, कुशल कंप्युटर इंजिनियर असे लोक समाजाच्या प्रगतीला ठोस हातभार लावतात. एखादा हुषार चुणचुणीत, बुद्धीमान तरुण असेल तर त्याने सैन्यात जाऊ नये असेच मला वाटेल.
सगळे सैनिक हे तळहातावर शिर घेऊन सीमेची रक्षा करत नाहीत. कित्येक लोक वशिला वापरुन सुरक्षित स्थळी नेमणूक करून घेतात. नाविकदल, वायुदल हे लोक युद्ध होत नसेल तेव्हा फार जीवावरचे काम करतात असे वाटत नाही. (वायुदलातील बजबजपुरीमुळे जुनाट झालेली धोकादायक विमाने उडवणे हे धोक्याचे काम असेलही पण ती सर्वथा वायूदलाची चूक आहे)
माझे मुद्दे वादग्रस्त वाटले तरी त्यावर विचार करावा.