कुशाग्र यांच्याशी सहमत आहे. फक्त लोकप्रिय कवितांचे (उदा. प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं सारख्या) विडंबन इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिले आहे की 'अति झालं आणि हसू आलं' अशी अवस्था होते.
अर्थात, संजोप रावांनी म्हटल्याप्रमाणे 'झेंडुची फुले' सारख्या दर्जेदार विडंबनांचा दर्जा मूळ काव्यापेक्षाही अधिक वरचा म्हणता येईल.