सुंदरतेची ही सापेक्षता
नेहमीच सलत आलीय माझ्या
हृदयात
खरच सुंदरता बसली असते
प्रेमळ भाऊक पाहणाऱ्याच्या
डोळ्यात
सुंदरता सापेक्ष असते. लेखकाच्या इतर कविता वाचून साधारण त्याच्या लेखन प्रकाराचा अंदाज लावता येतो. तुम्हाला माझ्या काही ओळी कुरूप वाटतात या वाटण्यातच माझा सापेक्षतेचा अनुभव दृढ होतो.
आपल्याला काही गोष्टी कुरूप दिसतात. मानवी अस्तित्व विकार युक्त आहे हे सत्य आपल्याला टाळता येत नाही. जेव्हा या गोष्टी ची जाणिव होते तेव्हा कष्ट होतात. कधाचित आपलच मन खायला लागतं पण याने आपण आपल्याला एखाधी गोष्ट कुरूप वाटली हे सत्य अमान्य करता येणार नाही.
संवेदनाशील कविने नेहमी गोड गोड लिहावे असे कुठे लिहिले आहे? त्याने कटू सत्य का लिहू नये? आपल्याला वाटलेली खंत का लिहू नये?
तुम्ही नेमके ठिकाण उधृत करून प्रतिसाद लिहिलात म्हणून उत्तर देतोय. फक्त कुरूप वाटली म्हणणाऱ्यांना किंवा समज देणाऱ्यांना मला उत्तर लिहिता आले नाही.
आपलाच
(संवेदनाशील)
तुषार