मराठी समाज हा बराचसा बुध्दीजीवी आहे. मराठी माणूस पैशाकडे उदासीनपणे पहातो व एखादा काही करु पहात असेल तर त्याला लोभी मानून अपराधीपणाची भावना देतो.  अपयश आल्यास नातेवाईक, समाज साथ देईन अशी खात्री वाटत नाही. 'वाईन अन्ड डाईन टुगेदर' हे सहज पचनी पडत नाही. घरातील संस्कारही व्यवसायासाठी पूरक नसतात. या विषयी  ख्यातनाम बांधकाम उद्योजक शिर्के यांचे विचार वाचनीय आहेत. भारतात चित्रपट व्यवसाय आणला दादासाहेब फाळकेंनी , तो आहेही मुंबईत पण आपला सहभाग अजूनही तुरळकच आहे. पंजाबी व दाक्षिणात्यांना तो जणू त्यांचाच प्रांत वाटतो. एकंदरीत मानसिकता याशिवाय दुसरे कारण दिसत नाही. पण हे सर्व करण्याची  क्षमता मात्र आहेच आहे, उदा; किर्लोस्कर, गरवारे, कल्याणी, शिर्के, डिएसके, माधुरी दीक्षित, नाना पाटेकर, सदाशिव अमरापूरकर, मिलिंद सोमण, मधू सप्रे , भरत दाभोळकर ,सचिन, गावस्कर इत्यादी..

आता एखाद्या गुणवत्ता यादीत आलेल्या मुलाने जर मला चित्रपटात हिरो व्हायचे असे मुलाखतीत सांगितले तर मराठी समाजाच्या प्रतिक्रिया काय असतील याचे कल्पना चित्र रंगवून पहा.

अभिजित