हया वरुन आठवली ती 'फोर क्वाड्रंट मेथड' जी 'टाईम मॅनेजमेंट' साठी फार उपयुक्त आहे.

क्वाड्रंट १ - महत्वाची आणि तातडीची कामें

ही कामें बाजुला ठेवणे परवडणारे नसते , ही कामें झाली नाहीत तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते अथवा त्यामुळे तुमच्या इतर कामात मोठा अडथळ निर्माण होऊ शकतो. आणि बहुतेक वेळा ही कामें तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच करावयास लागतात.

महत्वाची असली तरी ही कामें तुमचा वेळ खातात. शक्यतो अशी 'महत्वाची ' कामें 'तातडीची' बने तो पर्यंत थांबु नका.

क्वाड्रंट ३ - कमी महत्वाची पण तातडीची कामें

अनुभव असा आहे की अशी कामें ही तुमच्या पेक्षा दुस-या कोणाची तरी तातडीची निकड असते, ही कामें शक्यतो अंगावर घेऊ नयेत , दुस-यावर सोपवावीत (आणि तशी ती असतात देखील)

क्वाड्रंट ४ - कमी महत्वाची आणी कमी तातडीची कामें

ही कामें टाळाच. ह्या गटातले कोणतेच काम तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत नेणारे नसते, ह्यात वेळ दवडु नका.

क्वाड्रंट २ - महत्वाची पण हमखास पुढे ढकलली जातात अशी कामें

हा तुमचा महत्वाचा क्वाड्रंट! तुमचा जास्तीतजास्त वेळ ईथे गेला पाहीजे. तरच तुम्ही अशी कामें ऊरकु शकता जी तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत नेतील. कोणती कामें या क्वाड्रंट मध्ये येऊ शकतात?

१> आर्थीक नियोजन करणे, कर / गुंतवणुक सल्लागाराला भेटणे

२> नवीन काही शिकणे ज्याचा तुम्हाला तुमच्या ध्येयाप्रत जाण्यासाठी उपयोग होईल.

३> छंद जोपासणे

४> मेडिकल चेक-अप करुन घेणे

५> विमा ऊतरवणे

६> कुटुंबीयांसाठी वेळ देणेः मुलांचा अभ्यास घेणे/ खेळणे, एकत्र फिरायला जाणे, लहान मोठे पिकनिक, निदान रात्रीचे जेवण तरी कुटुंबीयांसमवेत हसतखेळत, गप्पा मारत घेणे

७> एखाद्या चांगल्या सामाजीक कार्यास वेळ देणे

८> व्यायाम करणे