देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सैन्याची आवश्यकता तर आहेच. आपल्या समाजरचने मधे लहानपणापासुन अशी समजूत करुन देण्यात आली आहे की जो सैन्यात जातो तो उदात्त विचाराने देशाचे संरक्षण करायाला जात आहे. एका दृष्टीने ते बरोबर आहे, पण सैनिक ही देशाची नोकरीच करत असतो. हा नोकरदार सैनिकच वेळ येताच, जिवावर उदार होऊन लढतो, घायाळ होतो व क्वचित प्रसंगी प्राण गमावतो. नुकताच सैन्यात भरती झालेला व रणांगणावर विरगती प्राप्त झालेला सैनिक, हे एकाच माणसाच झालेलं ट्रान्सफारमेशन आहे आणि या गोष्टीला देशप्रेमाचे एक झळाळतं वलय आहे.
सैनिकांचे जिवन खडतर आहे, मान्य आहे. पण आपलं जिवन काय खडतर नाही? नुसतेच मोठे पगार दिसतात, पण त्यामागे लपलेला त्याग दिसत नाही. दिवस-रात्र कष्ट करुन पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स दिसत नाहीत. दुरच्या खेड्यात बदली झालेली दिसत नाही. पोलीसांच जिवन काय कष्टमय नाही? आपलं सर्वांचेच जिवन खडतर व कष्टमय आहे, परंतू आपल्या नोकरीला देशप्रेमाचे वलय नाही. म्हणून मला वाटते आपण सैनिकांचे फाजील उदात्तीकरण करतो. सैन्य हे एक नेसेसरी इव्हिल आहे. सैन्य हे संरक्षणाकरता आहे. - हे वृकोदर यांचे म्हणणे एकदम बरोबर आहे.
राहुल