मध्यंतरी 'तहलका' ने सैन्यातला भ्रष्टाचार उघडकीला आणला. कोटी-कोटी मागितले गेले. पण मी पार निराश झालो. त्यात एकही मराठी नाव नाही.
गोराजी
आपल्याला नक्की काय म्हणायचंय कळलं नाही. मराठी माणूस मोठे व्यवहार करायला घाबरतो, किंवा तो फार श्रीमंत नसतो वगैरे इथपर्यंत कळलं. पण माणसानं भ्रष्टाचार केला नाही तर आपण पार निराश झालात? हे कळलं नाही. मुळात असा विचार कुणी मराठी माणसांबद्दल करु शकतो हेच धक्कादायक आहे. हीच शिकवण आपण आपल्या पुढच्या पिढीला पण (तुमचं लग्न झालंय का नाही किंवा मुलं आहेत का नाही हे माहित नाही) देणार का?
तुम्हाला काय म्हणायचंय ते जरा नीट सांगितलंत बरं पडेल.
- मिलिंद