सैन्यदेशाच्या रक्षणासाठी आवश्यक आहे हे मान्य. पण प्रत्येकाने सैन्यात भरती व्हावे अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. आपण चरितार्थासाठी व्यवसाय निवडतो त्यात निवडीमागे अनेकविचार असतात. यापैकी काही  व्यवसायात जिवाला धोका असतो पण जेव्हा एखादीव्यक्ती त्या व्यवसायाची निवड करते तेव्हा ती हे धोके व्यवसायाचा एक भाग म्हणूनस्वीकारते. अजूनही असे बरेच व्यवसाय आहेत की जिथे जिवाला धोका असतो. पोलिस,गुप्तहेर, अतीमहत्वाच्या(!) व्यक्तींची सुरक्षा, अणुभट्टीमधे काम करणारे कर्मचारी इ. मला वाटत आपल्या मनातली सैनिकांची प्रतीमा (शूर, निडर) काहीशी  आयडियलाइज्ड  असते.  त्यात  चित्रपटांचाही मोठा  वाटा आहे.  सैनिकांच खर चित्रण करणारे सेव्हींग प्रायव्हेट रायन सारखे चित्रपट विरळा.



चर्चेचा मूळ मुद्दा ः माझ्या नात्यातल कोणीही सैन्यात नाही. पण मला त्याबद्दल गिल्ट फिलिंग अजिबात नाही.