फा. फे.
माझेच प्रतिसाद वाचलेले दिसताहेत. आपल्या पुराण कथांना एकदम वैज्ञानिक मुलामा चढवणाऱ्या प्रत्येकाला पाहिल्यावर मला वर्तकांची आठवण येते.
वर्तकाश्रमाबद्दल फारसे माहित नाही, आपण तिथे काय चालत यावर प्रकाश पाडलात तर बरं होईल.
असो. माणूस तसा व्यासंगी आहे. संस्कृतचा गाढा अभ्यासक. त्यांनी दिलेले प्रसंग रामायणात व महाभारतात तसेच्या तसे आहेत हे सत्य. आणि त्यांच लिखाण वाचायला आवडत, आपण म्हणजे एकदम "ग्रेट" अस वाटत, पटत मात्र नाही. एक वैज्ञानिक विश्लेषण असे,
सीतेच्या शोधाकरता काही वानर पूर्वेस जायला निघाले असता, कुठपर्यंत जायचे हे सांगण्याकरता सुग्रीवाने त्यांना तालवृक्षाची खूण सांगितली. वानरांना हा तालवृक्ष जो चक्क शिवाच्या त्रिशूळा सारखा दिसतो तो "पेरू" या देशांत आढळला.
आता पेरु जर पूर्वेला असेल तर पाकिस्तानही पूर्वेला कारण पृथ्वी गोल आहे, करा पूर्वेकडून भ्रमंती वाटेत येणारे सर्वच पूर्वेला.
असो. आणखी काही हास्यास्पद मुद्दे
मेक्सिको हा प्राचीन मक्षिका देश आणि बोगोटा हे भोगावती शहर... जे काही असेल ते, आम्ही जमिनीवरुन चालणारी माणसं, आपण काही इतक्या उड्या नाही मारु शकत. एक सोय मात्र झाली, नाक वर करुन एखाद्या मेक्सिकन माणसाविषयी बोलायचे झाल्यास "अहो हा मक्शिका प्रांतिय पहा.." अस बोलता येतं.
अध्यात्माविषयी मी न बोलणे उत्तम.