काही लोकांना ही कविता कुरूप का वाटली हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.... माझ्या मते तुषार यांना 'सुंदरता ही सापेक्ष' आहे हेच सांगायचे आहे ना. कुणाला जे सुंदर वाटेल ते मला वाटेलच असे नाही ना.... आणि मला जे सुंदर वाटत नाही हे दुसऱ्या कुणाला सुंदर का वाटावे हा प्रश्न पण स्वाभाविक आहे... (मला कारल्याची भाजी आवडत नाही, बाकीच्यांना कशी काय आवडते बुवा? हा प्रश्न स्वाभाविक नाही का?)
शिवाय पुढच्याच ओळीत त्यांनी म्हटले आहे की
कदाचित इतरांना ते
सर्वांग सुंदर, मनोहर दिसत
असायचे
मग या कवितेवर इतकी टिका करण्याचे कारण काय?

-शशांक उपाध्ये