आमच्या शेजारच्या घरी या ब्रम्हकमळाच्या कळ्या आल्यापासूनच चर्चा फुलू लागली होती. सर्व शेजाऱ्यांना बोलविले होते. नंतर  मध्यरात्री त्या फुलांचे पुंकेसर शंकराच्या पिंडीप्रमाणे दिसतात म्हणून हळदी कुंकू वाहून फोटोही काढण्यात आले. त्या दिवशी 'कौतुकाचे कमळ' या शब्दाचा अर्थ कळला.  दुसऱ्यादिवशीही त्यांच्या घरी १.५ दिवसाचा गणपती विसर्जित केल्याप्रमाणे वातावरण होते. पुढच्यावर्षी आमच्याच घरी १५ फुले आली. आता म्हंटले प्रत्येक फुलाला एक एक टीकली लावून फोटो काढावा.

बाकी हे फुल खरोखरच अतिशय सुंदर दिसते !

अभिजित