मृत्यूमुळे दुरावलेल्या 'नात्याची' तुलना, काळाच्या अलंघ्य अंतरामुळे हरवलेल्या नात्याशी करणे योग्य आहे असे मला वाटते.
लहानपणी शाळेत भेटलेला प्रिय मित्र आता परत कुठे भेटणार, तो हरवलाच. तसे म्हणजे त्या नात्याचा मृत्यूच की.
मला वाटते, मृत्यूविषयी आपल्याला भीती, दुःख जास्त होते, कारण हरवलेले सापडणार नाही अशी खात्री असते. शाळेतला मित्र शाळा बदलल्यामुळे हरवला तरी जगाच्या पाठीवर कुठेतरी भेटेल अशी एक शक्यता असते. मृत्यू म्हणजे सगळ्या शक्यता शून्य.