तुषार,
एक कवी म्हणून जी वेगळि नजर मला अभिप्रेत आहे त्याबद्दल सांगते.केवळ काळी आहे म्हणून आफ़्रिकन माणसाची प्रेयसि सुंदर कशी हा तुला प्रश्न पडला,पण जागतिक सौंदर्य स्पर्धेत काळ्या स्त्रीयांना स्थान नसते का?म्हणून सौंदर्याची व्याख्या जाणणे योग्य.
संवेदनशील कवीने गोड गोड लिहावे असेही नाही.माझ्या लेखन प्रकाराचा अंदाज =गोड गोड लिहिणे असेल तर माझी कालची "प्रयाण"आणि "ब्र" ही कविता वाचावी.माझा असा समज होता की सामान्य माणूस आणि कवी यांच्या भावनिक प्रकटिकरणामधे फ़रक असतो.
शीला.