वातानुकूलित कचेरीत बसून आणि ढमाढम पगार घेऊन आपल्याला सीमेवर लढणारे आपले सैनिक "केवळ" शूर दिसतात (ते शूरच असतात... माझं दुमत नाही), शिवरायांच्या सैनिकांच्या ठायी दिसतात. आपण मुक्त कंठाने त्यांची स्तुती करतो. जिथे तिथे त्यांची वारेमाप उदाहरणे देतो.  पण कधी त्यांची कुतरओढ, असहायता दिसते का?

भारताच्या कुठल्याहि शहरातला (वातानुकुलित अगर बिगर-वातानुकुलित) ठिकाणी काम करणारा माणुस सध्याकाळी सुखरुप घरी येइल याची खात्री देता येत नाही. आजच्या घडीला तरी सिमेवरचे सैनिक जास्त सुदैवी आहेत, किमान मृत्यृचे काहि संयुक्तिक कारण तरी त्याच्याबाबत सागंता येते.

असो,

आमच्या कुटुंबात कोणीहि सैन्यात नाही !

कोणी जावु इच्छित असेल, तर फ़ारच छान !

आपल्या माहितीतील एखादा सैन्यात भरती झाला असल्यास त्याने तसं का केलं?
कारण कि देशामधे राहुन उपाशी मरण्यापेक्षा सिमेवर राहुन पोट भरलेल चांगल..(हि ग्रामीण भागातली मी अनुभवलेली परिस्थिती आहे, देशभक्ति च्या ओढ्याने हि सैन्यात भरती होण्याऱ्याची संख्या लक्ष्यणीय आहे.)