मराठी माणसाला पैसा कमावता आला पाहिजे यात वादच नाही, आज आम्ही शेअर बाजारात काम करणारी माणसेही बघतो कि आज मराठी माणुस जागरुकतेने गुंतवणूक करत आहे. पण आपल्या तात्या साहेबांसारखे गुंतवणुकदार बरेच कमी आहेत.
एकंदर परिस्थीति अशी आहे की, आजच्या या पुढारलेल्या मरठी विश्वातही ठाण्या - मुलुंड पासून ते थेट र्चचगेट - विरार म्हणा अथवा छ. शि. ट. पासून वाशि म्हणा, सर्वत्र मरठी माणूसच नोकर आहे (घरातले कामवाले).
आपल्याला लहानपणा आसुन घरची आथवा वाडवडलांकडून अशी शिकवण असते की आपला फ़ायदा आधी भला दुसरा खड्ड्यात गेला तरीहि चालेल. या व्रुत्तीचाच आपल्याला तोटा झालेला आहे. आपण वाडवडलांची दुश्मनी कायम ठेवण्यात जास्त आदर मानत असतो.
आज मुंबईत आपण जे परप्रांतीय म्हणतो त्यात मराठी माणूस फ़क्त गिरणी कामगार वगैरेच्या स्वरुपात दिसतो (आत्ता गिरण्यातरी किती राहिल्यात म्हणा), आजचे परप्रांतिय म्हणवले जाणारे लोक आपला माणूस दिसला की त्याला रहायला जागा मिळण्यापर्यंत सोडत नाहित, आणि दुसरा जागा मिळवुन दिल्यानंतर तिसरा कसा येईल याची योजना करतो.
आपल्यात तसे नाही, आपली प्रव्रुत्ति अशी आहे कि "ज्याचे खावे मीठ, त्याचीच मारावी निट" (अशोभनीय वाक्यरचने बद्द्ल क्षमस्व).
यात आपली ऊन्न्तति कशी होणार?