नवरा चुकला ह्या सारखा परमानंद नाही.

:-) खरं आहे. याची प्रचीती कायमच येत असते. पण "नवरा नेहमीच चुकीचा असतो" अशी कायमस्वरूपी (अर्थातच दर वेळेस post-facto) शरणचिठ्ठी लिहून दिलेली असली तरी दर वेळेस तोच परमानंद पुन्हा कसा होऊ शकतो, बायकाच जाणोत. (कदाचित पुनःप्रत्ययाचा असावा.)

'अहो... मी गेली ११ वर्ष वेल्ह्यात शाळामास्तर आहे. मला माहिती आहे की वेल्ह्यातून रस्ता नाहीए.'

हे म्हणजे "रस्ता आहे", याचे confirmation मानावे, नाही का? कारण, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे...

'अगं, पुण्यातली माणसं जेंव्हा 'जगाचा' हवाला देतात तेंव्हा त्याचा संबंध त्या तालुक्यापुरता मर्यादित असतो. घाबरू नकोस.'

नशीब 'अष्टपुत्रा....' वगैरे नाही म्हणाल्या. नाही हो... भीती वाटते ह्या म्हाताऱ्यांची. तोंडात दात नसले तरी 'बत्तीशी' खरी ठरते.

;-)

एकंदरीतच लेख आवडला.

- टग्या.