नितीन राव,

तुमच्या माहितीप्रमाणे हा अनुभव खरा असेल तर please  हे अनुभव जाहीर करू नका.  माझ्या माहितीनुसार अध्यात्मात येणारे अनुभव हे स्वानुभव असतात. इतर लोक त्याच्याशी relate करू शकतीलच असं नाही.    बघा ना, एक अनुभव सांगितलात 'मर्कट', अंधश्रध्द' अशी शेलकी विशेषण मिळाली.  cause आणि effect मधे तर्कसंगती लागली नाही की आपण त्याला चमत्कार म्हणतो आणि त्याची अशीच हेटाळणी होत रहाणार. दोष त्यांचा नाही.  १ वस्तु २ ठिकाणी एकाच वेळेला असू शकत नाही असं आपण मानत होतो की नाही पण quantum mechanics मधे असं घडू शकतं हे आता प्रयोगांनी सिध्द झालं आहे. तसंच, भविष्यात या अनुभवांची पण तर्कसंगती लागू शकते. 

 अध्यात्मिक शक्तीचे, उपासनेचे अनुभव काही मी घेतले आहेत, काही बघितले आहेत. पण मी ते सांगणार नाही आणि सांगायची गरजपण वाटत नाही. याला कोणी पलायनवादी म्हणत असेल तर खुशाल म्हणोत. मला मिळालेला आनंद तर ते हिरावून घेवू शकत नाहीत.

मेट्रीक्स मधे एक संवाद आहे, मॉर्फियस च्या तोंडी. '.. Unfortunately, not everyone can be told what matrix is..'