मी नितीनच्या मताशी सहमत आहे आणि इतरांच्या विचारांची कदर करतो. पण स्वतःला अनुभव आला नाही म्हणजे समोरील व्यक्ती खोटे बोलत आहे किंवा यासगळ्या भाकडकथा आहेत हे बोलणे चुकीचे आहे. समजा उद्या आपल्यापैकी  (नितिनला आज विरोध करणाऱ्यांपैकी) कोणाला असा अनुभव आला आला तर तुम्ही नितिनच्या मताशी सहमत व्हाल पण म्हणून तुम्ही इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा हे म्हणणे चुकीचे होईल.... की तेंव्हा तुमची प्रतिक्रिया ( किंवा पवित्रा म्हणा) अशी असेल की मला अनुभव आला म्हणजे माझ्याप्रमाणे विचार करणाऱ्या बाकी लोकांनी पण हे मान्य केले पाहिजे !(कोणीहि नक्कीच नाही करणार.) तेंव्हा तुमच्याकडे पण पुरावे मागितले जातील. प्रत्येक गोष्ट पुराव्याने सिद्ध होतेच असे नाही आणि पुरवा नसला तर खोटी होते असेही नाही. कारण नेहमीच पुरावे मिळणे शक्य नसते आणि खोटे पुरावे पुरवणे आज काल सहज शक्य आहे.जसे नितिन सांगितले त्याप्रमाणे तो सहजच खोटा पुरवा सादर करू शकतो पण त्याने वेळ मागितला आहे  आणि आपण तो त्याला दिला पाहिजे उद्या त्याने कोणाचाही फोटो बहिणीचा फोटो म्हणून दिला तरी आपल्याला ते समजणार नाही?   बऱ्याच गोष्टींसाठी  पुरावे मिळत नाहीत उदा. जीवाची उत्पत्ती कशी झाली. प्रतिसाद वाचताना हे लक्षात आले  की ८० टक्के लोक नास्तिक आहेत तेंव्हा त्यांनी " साद देती हिमशिखरे " हे पुस्तक आवर्जून वाचावे (मला या पुस्तकाचे लेखक आठवत नाहीत आणि आता हे विचारू नका की यात काय लिहिले आहे ... ते पुस्तक वाचल्यावर कळेलच).
अवांतर- प्रति सन्जोप राव
मनोगत वर लिखाणाचे शुद्धलेखन आणि व्याकरण या बाबत आग्रह असावा पण शुद्धलेखन नाही म्हणून  वाचता येत नाही असे नक्कीच नाही त्याचा  दैविक / आध्यात्मिक असा काही संबंध आहे असे मला नाही वाटत. का सिंह लिहिले आहे पण वेलांटी चुकली म्हणून ते गाढव असे तर वाचनात येत नाही ना? लिहिणाऱ्याचे बोलणे (मत) समजते आहे ना? मग झाले तर . त्यामुळे वाचकांना त्रासदायक असे मला यात काही वाटत नाही ( इथे शुद्धलेखन चिकित्सेचा वापर करा अशी सूचना योग्य वाटली असती) [अध्यात्मिक की आध्यात्मिक / आस्तीकतेने की आस्तिकतेने / नास्तीकाची की नास्तिकाची  नक्की बरोबर कुठले ?  हे नक्की करावे मग शुद्धलेखनाच्या गोष्टी कराव्या]
प्रति नितिन... फोटो लवकर पाहावयास मिळाला तर  बरे नाहीतर अमोल(भटका) याचा सल्ला मानावा. मला पण बरेच (स्वतःचे) अनुभव आहेत पण अमोलचा सल्ला मला मोलाचा वाटतो  

माझी काही चूक झाली असेल तर माफी असवी.

 -- बंधु