मागच्या वेळी मुंबई विमानतळावर पासपोर्ट तपासणारा पोलीस माझ्याकडे चक्क पाहून, स्मितहास्य वगैरे करून - "वेलकम" म्हणाला होता.

मला हा अनुभव नेहमीच येतो (माझ्या आडनावाचा महिमा !). तो अमुकतमुक तुमचा कोण हा प्रश्न केवळ पारपत्र तपासणी अधिकारीच नव्हे तर सामान तपासणी अधिकारीही करतात आणि बॅगा वगैरे उघडायला न लावता सरळ जाऊ देतात. अर्थात, माझ्याकडे तसलं काही नसतं ही बाब अलाहिदा !