भारतीय महिने आणि पाश्चिमात्य महिन्यांची संख्या एकच असली तरी भारतीय महिने चांद्रमास - चंद्राच्या पृथ्वीभोवती फेरी पूर्ण करण्याला लागणाऱ्या कालावधीवर बेतलेला- आहे, तर पाश्चिमात्य महिने सौरमास आहेत.
पाश्चिमात्य महिन्यांमध्येही पूर्वी सप्टेंबर सातवा, ऑक्टोबर आठवा इ. महिने होते, त्यावरूनच तशी नावे पडली होती. ऑगस्टस राजाच्या स्मृतीप्रित्यर्थ ऑगस्ट महिनी त्यात समाविष्ट झाला. तो त्या राजाच्या जयंती/मयंती/इतर विशेष घटनेनुसार सप्टेंबर पूर्वी घातला गेला. तसेच आणखी काही महिन्यांचे आहे. पुरेशी माहिती नाही. इतरत्र वाचलेल्या माहितीच्या अंधुक आठवणींवर हे लिहीत आहे.
जानेवारी पासून वर्षारंभ करण्याचे नक्की कारण माहीत नाही. मात्र ते नाताळशी संबंधित असावे असे वाटते. नाताळनंतरचा महिना तो पहिला इ.