शरदरावांनी मांड्लेला चर्चेचा प्रस्ताव महत्वाचा आहे आणि सुहासीनी बाईंशी मी सहमत आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबई शहरात भोंगे वाजवून सर्व शहर २ मिनिटंसाठी स्तब्ध राहाणार आहेत आणि श्रध्दांजली वाहणार आहेत. आत्ताच एका नव्याने तयार केलेल्या वेबसाईट्ची माहीती ईथे देत आहे, जिथे श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि आपल्या राजकीय पुढाय्रांना सक्रीयतेचे आवाहन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाकी काही नाही तर निदान तिथे सही तरी करावी अशी आशा करतो. मुंबई बाहेर किंवा अगदी मुंबईत असलात तरी वेळेवर तमाम मुंबईकरांबरोबर आपण आहोत हे दाखवता येईल.  आणि हो आपल्या जगभरच्या भारतीय मित्रांना पण ही माहीती कळवा.