कोन म्हनतयं ह्ये खरं न्हाई??? १००% खर हाय.
पन नितीन राव आता माजाबी अनुभव गुमान ऐकून घ्यायचा आनि त्यो बू खरा हाय म्हनायचं
आमच्या गावाजवळच्या रानात येक भूत हाये... दर अमोशेच्या रात्री त्ये बिडी वडत रानातनं फीरत असतय.. 'बिडी वडनारं भूत' म्हनून आजुबाजुच्या गावां मदे लय टरकून असत्यात लोकं त्याला ... यकदा येका टारगट मानसानं त्येचा फोटू काढायचा प्रेयत्न केलता तर काय राव फोटू मंदी नुसतीच बीडी.. अधांतरी..भूत गायब... आक्षी खरं सांगतो बगा...
मला म्हाइत हाये नितिन राव तुमी इश्वास ठेवनार ह्यावर..
पन बाकीच्यांनो, ह्यो माजा अनुभव हाय आनि त्यो खरा असनारच..तुमी अनुभवलयं का असलं कायबी ? न्हाई नव्हं ...मग गप बसा..
सोत्ताचा अनुभव हाये म्हंटल्यावर 'का?' म्हनून इचारायचं न्हाई.. तवा हाताची घडी आनि तोंडावर बोट..
जाता जाता - नितिन राव तुमच्या ह्या म्हाराजासनी अजून येक जादू कराया सांगा की राव.. त्यासनी म्हनावं खेडूत मानसाला येकादं लागलेलं लॉटरीच तिकिट द्याकी पाटवून.. अवो लै पावरबाज दीसत्यात तुमचं बाबा ..त्यासनी काय अवघड हाय व्हय? तवा जरा आमचं मनावर घ्या राव!