श्री विनायक,
तुमच्या माहितीस्तव श्री मिलिंद फणसे यांचे लिखाण परत उद्धृत करत आहे. "प्रवासींच्या प्रतिक्रियेला योग्य मान देऊन कविता काढून टाकली आहे.त्यांच्याप्रमाणे अन्य कोणाच्याही भावना दुखावल्या असल्यास मला खेद आहे."
१. या वरील शब्दांचा अर्थ "मी स्वखुषीने कविता काढत आहे" असा होतो का?
२. कवींना जर कविता स्वखुषीने काढायाचीच होती तर त्यांनी ती पहिल्यांदा मनोगतावर टाकलीच कशाला असती?
३. समीक्षा करण्याला विरोध नाही, पण समीक्षेचे रुपांतर कसाईखान्यात होणार असेल तर गझनी या शब्दापेक्षा दुसरा कुठला चांगला शब्द वापरू हे सुचवा.
४. जर नकारात्मक समीक्षेपायी साहित्य संपुष्टात येऊ लागले तर समीक्षकांना जास्त महत्त्व द्यायचे की साहित्याच्या निर्मात्यांना?
५. नकारात्मक टिका म्हणजे मला काय वाटते हे मी खालील उदाहराणाचा सहारा घेऊन सांगतो.. (समर्पक शब्द आठवत नाही आहेत म्हणून), तसलीमा नसरीन ची लज्जा कादंबरी. ह्या कादंबरीची भाषा, तांत्रिक बाबी यांची समीक्षा ही सकारात्मक आणि नकारात्मक अशी दोन्हीही बाजुंनी करता येऊ शकते, काही समिक्षक असेही म्हणतील की ही कादंबरी साहित्यातल्या तांत्रिक दृष्टिने फार सुंदर नाही... ही झाली नकारात्मक टीका. पण काही लोकांनी त्यातला मसुदा आवडला नाही म्हणून प्रकाशकांवर दडपण आणून त्या कादंबरीची छपाई बंद करणे ही नकारात्मक टीका नाही... तो नकारात्मक 'व्यवहार' आहे!
६. मनोगतावर आलेली श्री मिलिन्द फणसे यांची कविता हा प्रवासी आणि मिलिन्द य दोघांतील निजी मामला कसा? फणसे यांच्या त्या कवितेवर आम्हा रसिकांचा काहीच अधिकार नाही का??
क.लो. अ.
ऋतु