प्रियाली,

प्रस्तावाचा विचार करण्याबद्दल आभार.   

ही चर्चा मी सुरू केली असती तर बरं झालं असतं, हे खरंच आहे.  पण मला आधीच्या चर्चेत (?) जेवढे प्रतिसाद मिळाले त्याच्या निम्यानेही मिळाले नसते हेही तितकंच खरं आहे.  मनोगतावर नियमित येणारे इतर किती सदस्य आहेत मला माहीत नाही.  मी शेवटी पाहिले तेव्हा कोर्डे यांच्या प्रस्तावाची १२० हून अधिक वाचने झाली होती.  पण प्रतिसाद म्हणाल तर त्यानंतर कविता७७ यांचा एक आणि माझा दुसरा प्रतिसाद वगळून तिसरा -तुमचा माझ्या प्रस्तावाला आणि  चवथा -नाम्या यांचा प्रतिसाद आला.  

 नाम्या यांच्या वेबसाईट बद्द्ल त्यांचे आभार.  पण केवळ तेवढेच करून न थांबता हातानं सह्या केलेली पत्रे तुमच्या लोकप्रतिनिधींना जरूर पाठवा, ही हे वाचणाऱ्या सर्वांनाच विनंती. 

मी मला आलेल्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देऊ शकत नाही आणि देणार नाही.  फक्त एवढेच सांगते, की आपल्या समाजाचा मोठा भाग निद्रिस्त अवस्थेत आहे.  कुठेतरी मी गेल्या दोन दिवसांतच अश्या अवस्थेलाच कोणीसा एक इंग्रजी शब्द वापरल्याचे वाचले- तो म्हणजे "सोशल कोमा"..   तुम्ही कोणी "मॅट्रिक्स/मेट्रिक्स" हा सिनेमा पाहिला असला तर त्यातही अश्याच एक प्रकारच्या  अवस्थेचे सूचक वर्णन आहे.  आपण ही अवस्था ओलांडून पुढे जाणार की नाही, हा खरा प्रश्न आहे.   

 

सुहासिनी