मी असं कधीच म्हणालो नाही की 'रिलेटिव्हीटीने हे सिध्द होईल'. मी फक्त quantum mechanics मधलं उ. दा. दिलं की एखादा विश्वास (वस्तू २ जागी एकाच वेळेला असणं) संशोधना नंतर बदलू शकतो. 

तुमच्या निर्बुद्ध अंधविश्वासांच्या संदर्भात क्वांटम थिअरी आली कुठून? उगाच वडाची साल पिंपळाला? तो हायझेनबर्ग रडत असेल त्याच्या थडग्यात !

पण ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही. त्या विषयाच्या इतर अभ्यासकांना मतिमंद म्हणण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण स्वःताला सर्वज्ञ समजता का? का आपल्याला असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली आहेत आणि आता शोधायचं असं काहीच उरलं नाही. आणि जर तुम्ही खरच या विषयाचा अभ्यास केला असेल तर जरूर सांगा चर्चेची माझी तयारी आहे.

अभ्यासकाना मतिमंद म्हणण्याचा मला कोणी अधिकार दिला नाही. पण तुमच्यासारखे लोक जे काही भकत असतात तो अभ्यासही नाही आणि तुम्ही कसले बोडक्याचे अभ्यासकही नाही.मी स्वतःला सर्वज्ञ वगैरे समजत नाही. मला सर्व प्रश्नांची उत्तरे सापडली आहेत असे मला वाटत नाही. शोधायचे काही उरले नाही असेही मला वाटत नाही. या विषयाचा अभ्यास म्हणजे "अंधश्रद्धा निर्मूलन" या गोष्टीचा असे तुम्हास म्हणवयाचे असल्यास माझा नाही बुवा अभ्यास. "गुरुमहाराजांच्या चमत्कारांचा" अभ्यास म्हणाल तर तुम्हाला मी मानसिक स्वास्थ्य तपासायची शिफारस केलेली आहेच!