तुमच्या निर्बुद्ध अंधविश्वासांच्या संदर्भात क्वांटम थिअरी आली कुठून? उगाच वडाची साल पिंपळाला? तो हायझेनबर्ग रडत असेल त्याच्या थडग्यात ..

अरेच्या! तुम्ही उदाहरणावर का वाद घालत आहात? माझा मुद्दा एवढाच आहे की आजची unknown/obscure गोष्ट उद्याची known fact  होवू शकते. पुरेशा संशोधनानंतर.  तसच आज ज्यांना आपण चमत्कार समजतो, त्यांची तर्कसंगती भविष्यात लागू शकते.

पण तुमच्यासारखे लोक जे काही भकत असतात तो अभ्यासही नाही आणि तुम्ही कसले बोडक्याचे अभ्यासकही नाही

माझा आध्यात्माचा अभ्यास नाही हे कशावरून? आपण मला ओळखता का?

गुरुमहाराजांच्या चमत्कारांचा" अभ्यास म्हणाल तर तुम्हाला मी मानसिक स्वास्थ्य तपासायची शिफारस केलेली आहेच!

मी तुमच्याकडे कधी शिफारस मागितली? मतिमंद निवास किंवा मानसिक स्वास्थ्य तपासणे, हे अनाहुत सलले तुम्ही मला का देत आहात? आपला माझा काय संबंध? तुमचं या चर्चेविषयी / चमत्काराविषयी  मत / तिरस्कार/ घ्रुणा व्यक्त करा, त्याचं खंडन करा. पण वैयक्तिक सल्ले आणि टिका कशाला? माझा याला आक्षेप आहे!