अध्यात्मिक अनुभूति ही वैयक्तिक बाब असते हे भटकेरावांच मत मान्य आहे.
तसेच नितिनरावांकडे सुद्धा 'तो' फ़ोटो असेल सुद्धा. पण ज्यांना अध्यात्मिक गति आहे त्यांनी बापड्या विज्ञानवादी जनतेच्या आग्रहाखातर एखादा ढळढळीत चमत्कार (आधी जाहीर करून) करून दाखवायला काय हरकत आहे? तसेच देवानी सुद्धा एकदा भर चौकात सगळ्यांसमोर (आकाशवाणीने पूर्वसूचना देऊन) दर्शन द्यायला काय हरकत आहे? एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका राव.
वरिल प्रश्नांची उत्तरे विज्ञानवाद्यांची लायकी नाही देव पाहाण्याची, अध्यात्मिक गति असावी लागते वैगेरे शक्य आहेत. पण मग पुन्हा एकदा 'ईश्वरम असिद्धयत' ही वेद ऋचा सत्य ठरेल. आणि जे सिद्ध करता येत नाही ते विज्ञान नाही.