मला साक्षात्कार झाला... (महेश ऐकता आहात ना... प्रथम पुरुषी एकवचनी अनुभवकथन आहे.. सांगीवांगीची दूरची कथा नाही!)

अहो नाना - छायाचित्र काय घेऊन बसला आहात! बाबांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन सर्व शकांचे निरसन केले. (तात्या - लाख रुपये पाठवा बरं का!)

माझ्यासह अनेकांचे प्रश्न विचारणे म्हणजे मुखवटे घालून भोंदूपणाने वाद निर्माण करणेच होते ह्याचीही जाणीव मला झालेली आहेच... माझे परममित्र सन्जोप आणि वरुण यांनाही मार्ग सापडेल. तशी समजूतदार आहेत ही मंडळी!!

बाकी दुनियेत अनेक भोंदूबाबा वावरत असतील पण तरीही  नितिन यांनी सांगितलेले बाबा तेव्हढे खरे... अहो पंतांचे दाखले सोडा... ज्ञानेश्वरांवरही भिंत चालवली, पाठीवर धिरडी भाजली होती तरीही जागोजागच्या विसोबा खेचरांना अक्कल आलेली नाही.

फाफे, भटके, कुशाग्र, सुनील, लिखाळ आणि इतरही कोणी सुटला असल्यास ... चर्चेत सहभाग घेणाऱ्या आपणा सर्वांसाठी येथे मी बाबांचे छायाचित्रही दिलेले आहे. उगाच नितिनबाबांना छळू नका आता. अर्थात ज्याला दिव्य दृष्टी असेल त्यालाच दिसेल बरं का! भाव तसा देव!!

फक्त मिलिन्द यांच्यासाठी माझ्याकडे उत्तर नाही. मी अतिरेकी नाही हो! हे नितिनबाबाही अतिरेकी नाहीत.
भोमेकाका तर म्हणतात असा गुरुद्वाराच नाही... त्यामुळे अजूनच शंका!! त्यामुळे बाकी नवश्यागवश्यांचे माहीत नाही. जरा प्रशासनाच्या मदतीने त्याचा छडा तेव्हढा लावा!