येशू ख्रिस्त म्हणे मूळ भारतीय होता व त्याचे नाव विष्णु-कृष्ण वरून आलेले आहे.
वर्तकाविषयी मला माहिती नाही, पण सप्तांबर, अष्टांबर, इ. मी १९७७ साली पु. ना. ओकांकडून (तेच ते, "तेजोमहालय"प्रसिद्ध) ऐकले होते. त्यांनी असेही सांगितले होते की मिस्टर हा शब्द महास्तर वरून आला आहे. आम्ही तेव्हा पीजी करणारे उनाड विद्यार्थी होतो. आम्ही त्यांना सुचवले की पॉर्नोग्राफ़ी हा शब्द "पुराणग्रंथ" या शब्दावरून आलेला आहे तेव्हा मात्र ते चिडलेले आठवते.
बाकी काही असो, वारांची नावे आपल्या ज्योतिर्गणिताप्रमाणे "होरा" नावाच्या कालमापनएककावर आधारित आहेत हे पूर्वी वाचलेले आहे.
जशी तिथी, करण, योग यांची चक्रे असतात तसेच होऱ्यांचेही चक्र असते. होऱ्यांना ग्रहांची नावे असतात व सूर्यापासून (किंवा पृथ्वीपासूनही असू शकेल, या क्षणी नक्की आठवत नाही) बुधापासून ज्या क्रमाने (जवळपासून लांब, अंतराप्रमाणे) अंतराळात ग्रह असतात त्या क्रमाने त्यात्या ग्रहांचे होरे असतात. असे मोजताना ज्या ग्रहाचा होरा सूर्योदयाच्या वेळी असतो त्याचे नाव त्या वाराला मिळते. या गोष्टी कुठल्याही ग्रहगणिताच्या पुस्तकात तपशीलवार दिलेल्या असतात.
आता हा ग्रहांचा क्रम (म्हणजे किती अंतरावर कोणता ग्रह असतो, इ.) आपल्या ग्रहगणिती पूर्वजांना कसा कळला ते मात्र माहीत नाही.
मग प्रश्न पडतो की जगात सर्वत्र वारांची नावे बरोब्बर त्याच ग्रहांवरून त्याच क्रमाने कशी आली? याचेही उत्तर माझ्याकडे नाही. इतरांनी भारताची कॉपी मारली असावी एवढाच अंदाज करू शकतो.
दिगम्भा