एखादा विषय कसा कमकूवत आहे हे सांगण्यापेक्षा लेखक किती बावळट आहे / तो किती आढमुठेपणा करतो किंवा प्रतिसाद देणाराच स्वतःला शहाणा समजतो ह्यावरच वाद जास्त होतात. हळूहळू हि गोष्ट वैयक्तिक पातळीवर येते व आरोप प्रत्यारोप सुरू होतात.
--- सहमत आहे. असाच काहीसा प्रकार चर्चेतर विभागांतही दिसून येतो. कदाचित यामुळेच मी (आणि कदाचित इतरही अनेक मनोगती) चर्चा विभागापासून परावृत्त होत असावेत की काय असे वाटते.
मते मांडल्यावर अगर प्रतिसाद लिहिल्यावरचे 'ह. घ्या.', 'चूभूद्याघ्या', 'राग/गैरसमज़ नसावा' असे लिहिण्याची आता सवय झाली असली, तरी ही पाळीही अशाच प्रकारांमुळे आली की काय असे वाटते.