विविध विषय हाताळणारी सुंदर गझल आवडली. अभिनंदन.
विश्व सारे जिंकुनी येता
स्वागताला रास प्रेतांची...
पाणपोया निर्मितो आम्ही
रीघ दारी तान्हलेल्यांची
जन्मतः मी पोळलो गेलो
प्यास होती सूर्यबिंबांची
वावावा!!! अतिशय सुंदर. हे शेर खास आवडले.
अमिबाचा शेर वैज्ञानिक लेणे ल्याला आहे.
तुमच्या काही गझलांमध्ये यापूर्वीही पंढरीचे शेर वाचले आहेत. सुंदर असतात. अशा 'क्लासिकल प्रसाद' शेरांमागे काही विशेष कारण (ज़से विठू माउलींची प्रेरणा) आहे का?
प्रसादराव, पोलपाटाच्या ऐवजी पोळपाट असावे असे मला वाटते. टंकित करताना चूक झाली असण्याचा अंदाज़ आहे.
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.