अभिजित, आपण फक्त पुस्तके वाचतो आणि विचार सोडुन देतो. सिनेमात पैसा आहे पण आपण चारित्र्याला डाग लागेल म्हणुन तिथे जातच नाही. तिथे टेक्निकल कामे पुश्कळ आहेत. अशी अनेक क्षेत्रे आहेत.

राव, .... आपले दुर्गुण आपणच अनेक वेळा उगाळले आहेत. ते खरे आहेत. पण मला तोडगा हवा आहे. संपुर्ण समाज बदलेल असा काहितरी मार्ग असेलच.

मिलिंद, .... आपला समाज भ्रष्टाचारी आहे हे नाकारता का? माझे म्हणणे एव्ह्ढेच की १०० - २०० वर आपण खुश होतो. मोठे आकडे मागायची आप्ल्या लोकात हिम्मत का नाही? भ्रष्टाचार तर करायचा पण घाबरत घबरत असे का?इतर प्रांतीयंना ही हिम्मत का होते?

भ्रष्टाचारच करावा असे माझे अजिबात म्हणणे नाही.

अत्यानंद, .... आपण ज्या प्रमाणात कमवतो त्यापेक्षा जास्त खर्च करतो आहोत का? १०० घेणार्याची कातडी गेंड्याची नसते?

महेश, ... वेश्येचे उदाहरण खूपच जुने झाले. योगवाशिष्ठ्यातुन आजच्या जगात या. गरीबीतच आनंद वाटण्याचे कारण नाही. श्रीमंत माणूसकी जपत नाहीत हे कुणी संगितले? उलट गरजेला मराठी समाज श्रीमंतांकडेच झोळी पसरतो. उदा. महर्षी कर्वे यंनी युनिवर्सिटी काढली आणि आपण झोळी घेउन ठकरसींकडे गेलो आणि त्याचे नाव SNDT झाले. कर्व्यंची नावनिशाणी शिल्लक नाही.

 विक्रम, ... गिरण्या बंद झाल्यावर मराठी समाज कोलमडला. असे का झाले? आम्ही दुसरे कहीच क करु शकलो नाही? देशात कुठेही काहीही झले की आम्ही पैसा धाडतो, मग आपल्याच गिरणी कामगारांसाठी आम्ही काहिच कसे केले नाही? फक्त लोकलमधे तावातावाने या विषयावर वाद घालणार का? मंडळी, आपले दोष सांगणे बंद करूया. ते असणारच. नवीन पिढीला प्रोत्साहन देउया. पडला तर न हसता उठण्यासठी हात देउया. हे कसे करता येईल याचा विचार करुया.