१. कवितेचा मूड सारखा स्विंग होताना दिसतो. कवितेत फोकस नाही.
मध्येच राजकीय विधाने करण्याचा मोह कवीला आवरत नाही.
एकतर राजकीय कविता, विडंबन लिहा नाहीतर मग पेटून उठवणारी कविता लिहा. मग ती तद्दन कम्युनल, चिथावणीखोर असली (आणि मला असले लिखाण आवडत नसले तरी)तरी हरकत नाही. कमीतकमी चिथावणीखोरपणाला दाद दिली असती.
पण ही कविता मध्येच कुठेतरी लटकली आहे.
२. 'विव्हळत भोवळणारी आर्तता' शब्दबंबाळ आहे. 'धुमसत्या चितांचे कर्ज' काढल्याने एकंदरच परिस्थिती अजूनच चिघळते. ही काही उदाहरणे.
३. शब्दांची आणि अभिव्यक्तीची(एक्सप्रेशनची) निवड आवडली नाही. म्हणूनच कवीने केलेला 'विनयभंग' सोसवत नाही. त्याने 'पदर फेडलेली बापडी माय माझी' अतीच वाटते.
४. कविता पोरकट असली तरी वृत्तात आहे ही जमेची बाजू आहे.
हे माझे ह्या कवितेवरील अंतिम भाष्य. ते कवीला किंवा कुणाला पटायलाच हवे असे मुळीच नाही. म्हणून मला पुढे वाद घालायचा नाही. जेहेत्ते असे आहे.
चित्तरंजन