पण आजकाल हे पैलू वेगळ्याच पध्दतीने पडले (पाडले म्हणा हवं तर) जात आहेत. आपल्या मनोगतवर चर्चेचे रूपांतर भांडणात होत आहे.
चर्चा तिरक्या तिरक्या चालत असतात याच्याशी सहमत. पण निदान मी तरी आत्तापर्यंत कुणाला लक्ष्य करून एखाद्या चर्चेत झोडपलेले मला आठवत नाही.
आजकाल स्वतःच्या मनातील राग काढण्यासाठी तसेच स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी मनोगतचा वापर होतो आहे.
सहमत. माझ्यामते इथे मते मांडण्यात यावीत, लादण्यात येऊ नयेत. अशाप्रकारच्या (लादट) चर्चांमध्ये निषेध करण्याइतकाही सहभाग घ्यावा असे वाटत नाही.
'ह. घ्या.', 'चूभूद्याघ्या', 'राग/गैरसमज़ नसावा' असे लिहिण्याची आता सवय झाली असली,
मी मागेच म्हटल्याप्रमाणे सदस्यांनी टिका करताना आणि टिका सहन करतानाही थोडा खिलाडूपणा दाखवला तर फुकटचे ह. घ्या., चूभूद्याघ्या लिहायची वेळ येणार नाही.
साती