मात्र ११/९ नंतर अमेरिकनांना असा सल्ला दिला होतात का?
तोच तर फरक आहे. अमेरिकेवर असा हल्ला झाल्यावर सरळ जास्त शहानिशा न करता अमेरिकेने लादेन आणि अफगाणिस्तानला दोषी ठरवून अफगाणिस्तान भाजून काढला. लादेनने अजून मान वर करून अमेरिकेकडे बघितलेले नाही त्यानंतर. पण आम्ही मात्र धडधडीत निषेधही करू शकत नाही कुठल्या देशाचे नाव घेऊन! त्यासाठी"सीमेपलीकडिल अतिरेक्यांच्या कारवाया" असा शब्दप्रयोग करावा लागतो.
आमचं म्हणणं नाही की जाऊन पाकिस्तानावर हल्लाच करा पण जे करता येण्यासारखं आहे ते तरी करा- बांगलादेशी निर्वासितांना हाकला, अनाधिकृत झोपड्या बांधणाऱ्यांना हाकला, खोटे पासपोर्ट पुरवणाऱ्यांचा बंदोबस्त करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे किमान देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नांचे तरी राजकारण करू नका.
या आणि अशा गोष्टी अमेरिकनांना सांगाव्या लागल्या नाहीत. भारतीय राजकारण्यांना सांगूनही समजणार नाहीत. आमच्यासमोर एकच मार्ग उरतो हो मग टुकार का होईना कविता करून आपल्या रडगाणयाला वाट करून देणे.
साती काळे.