नितीन

दोन चार दिवस मुंबईत नसल्यामुळे तुमच्या आधीच्या प्रस्तावावर मी प्रतिसाद देऊ शकलो नाही.  खरंतर बुवाबाजी, थापेबाजी वगैरे थोतांड प्रकारातले चर्चा विषय माझ्या फार आवडीचे.  पण तुम्ही पुन्हा एक नवा प्रस्ताव टाकून माझी सोय केलीत त्याबद्दल धन्यवाद..!

आता आपल्या प्रस्तावाला उत्तर..

गुरूमहाराजानीं कसल्या ही प्रकारच्या पेश्याची, मदतीची किंवा इतर गोष्टींची अपेक्षा केली नाही. त्यांची भेट ३ - ४ वेळा झाली. त्यांनी 'माझ्यात हि शक्ती  आहे', किंवा 'मी हा चमत्कार करून दाखवतो' असे कधी ही सांगितले नाही.

अहो हा कथित चमत्कार हेच त्यांचं मार्केटिंग गिमिक आहे.  शिवाय तुमच्या इतके चांगले विक्रेते असताना त्यांना स्वतःला वेगळं बोलण्याची काय आवश्यकता?  

मला त्यांच्यात कसली आसक्ती जाणवली नाही.
त्यानं काय झालं? 

त्यांच्या बद्दल मला बरोबर माहिती योग्यत्या शब्दात विचारण्याचा त्रास फार कमी जणांनी घेतला.
योग्य शब्दात विचारतो, त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती देता का?  पुरेशी म्हणजे काय हे आतापर्यंत तुम्हाला चांगलंच लक्षात आलं असेल. 

गुरूमहाराज हे ढोंगी आहेत, हे बऱ्याच जणांनी नुसत्या माझ्या एका अनुभव लेखनांवरून तर्काने जाणले!
असे अनेक अनुभव लेखन केलेत तर सगळ्यांचीच केवढी करमणूक होईल.

तुम्ही कोणी त्यांना पाहिले नाही, ते कोण आहेत, कुठे आहेत, नाव - गाव काय.. काही माहिती नाही.
हेच सारं आपण आता तरी सांगाल का?  की आपल्यालाही ते माहिती नाही?  

पण मला विरोध करताना असा आव आणला जातो, की तुम्हाला १००% माहिती आहे की ते ढोंगी आहेत!
आव आणत नाही.   मला आणि तुम्हाला प्रतिसाद दिलेल्या सगळ्यांनाच तशी खात्रीच आहे.

मला ह्या पोकळ वादात किंवा टवळी करण्यात रसवाटत नाही.

तरीच मागच्या प्रस्तावात ८५ पैकी निदान ४० प्रतिसाद आपलेच होते आणि एवढं करुन भागलं नाही की काय म्हणून आपण आणखी एक नवा प्रस्ताव पण उघडलात.


आणि ह्या लोकांनी माझ्या कडूनं त्या संत माणसाचा पत्ता घेऊन त्यांना त्रास देण्याचा विचार फक्त स्वप्नातच करावा.

छे छे. त्यांना त्रास देण्याचा कुणाचाही विचार नाही. फक्त इतरांचा त्रास वाचवण्याचा विचार आहे.

हा विषय वादा करता केला नाही.

पण चर्चे करता केलात ना? मग चर्चेची तयारी ठेवावी.  लोक तुमचा आणि  बाबांचा फक्त उदो उदोच करतील अशी अपेक्षा करु नये.

आपल्याला अनुभव असल्यास सांगावा (जरुरती माहिती गोपनीय ठेवायला हरकत नाही.)

नसल्यास बोलू नये असं म्हणायचंय का?

येथे सत्य कथन अपेक्षीत आहे

हेच मला तुम्हालाही शेवटी सांगायचंय. थापेबाजी करू नये.  या गोष्टी म्हणजे निव्वळ थोतांड असतात.  दोन व्यक्तिंचा फोटो येतो आणि एका व्यक्तिचा येत नाही याला थापेबाजी नाहीतर काय म्हणायचं?  मला फोटोग्राफीतली थोडीफार तांत्रिक माहिती आहे त्यावरून सांगतो की तुम्ही म्हणताय तो चमत्कार वगैरे काही नाही.  बऱ्याच वेळेस तुम्ही बघता की एखाद्या फोटोत एखाद्या माणसाच्या डोळ्याच्या ठिकाणी नुसता पांढरा ठिपकाच येतो.  याचा अर्थ असा प्रत्येक मनुष्य चमत्कारी बाबाच झाला का?  फ्लॅशचा प्रकाश डोळ्यात परावर्तित झाल्यानं अस पांढरा ठिपका येतो.  असाच प्रकार इथंही झाला असेल.  बाबांनी आपल्या चेहेऱ्यासमोर आरसा / काच धरली असेल किंवा चेहेऱ्याला चमकणारा रंग लावला असेल, किंवा असंच काहीतरी.  दुसरं जाणून बुजून, फिल्म धूत असताना तिचा एकच भाग जर  ओव्हर एक्स्पोज केला तरीही असा प्रभाव पडू शकतो.  अर्थात हे खूप अवघड आहे पण अशक्य नाही.  थोडक्यात कुठच्यातरी आकलनीय कारणाशिवाय फिल्मचा एकच भाग ओव्हरएक्स्पोज होणं कुठल्याही परिस्थीत  अशक्य आहे.   कुणीही असा दावा करत असेल तर तुम्ही म्हणाल ते आव्हान स्विकारायला मी तयार आहे.

- मिलिंद