भाऊराव व विसोबाजी धन्यवाद.
चक्रपाणिजी तसेच जयंता५२ तुमच्या सूचना खालीलप्रमाणे स्वीकारल्या आहेत.
विधायक सूचनांसाठी आपले खास आभार. अशीच मदत करीत राहा.
सोबत मी जीवनाची पुढे करीत चाललो!
सोबत मी जीवनाची, पुढे करीत चाललो ।
हर काळजीस धुरात, मी मिळवित चाललो ॥ ध्रु ॥
मी शोक विनाशाचा, करणे होते व्यर्थची ।
जल्लोष विनाशाचा, करीत व्यक्त चाललो ॥ १ ॥
जे लाभले त्यालाच, मी नशीब मानले ।
ना लाभले, स्मृतीतुनी मी, त्यास मिटविले ॥ २ ॥
सुखदुःखभेद ना मुळीच जाणवे जिथे ।
मी तिथे, मनास सतत, नेत चाललो ॥ ३ ॥
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००६०७१२