या विषयातली मला फार माहिती नाही पण एका चांगल्या विषयाच्या चर्चेतून मिळत असलेल्या माहितीबद्दल एकलव्यांना धन्यवाद. 

एक छोटीशी भर या ठिकाणी टाकावीशी वाटते.  लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही समकालीन भाषा असल्यामुळे यात काही प्रमाणात भाषासाम्यता होती.  दुसरं भारतीय खगोल शास्त्राचा जगावर बराच प्रभाव होता असं कुठंतरी वाचल्याचं आठवतं.  आणि तिसरी गोष्ट म्हणजे भारताचा युरोपबरोबर व्यापार (अलेक्झांड्रिया बंदरातून) हजारो वर्षांपासून चालत आलाय आणि या जाणाऱ्या येणाऱ्या व्यापाऱ्यांनी आणि खलाशांनी बरेच इकडचे शब्द तिकडे नेले (आणि तिकडचे इकडेही आणले).  या सगळ्या कारणांनीही भाषा साधर्म्य आलं. सप्टेंबर, ऑक्टोबर... हाही कदाचित त्यातलाच प्रकार असावा.  चू.भू.दे.घे.