प्रवाळ प्रत्येक सोसण्याचा जपून मी ठेवला तळाशी
असेच का हे तयार झाले उरातले बेट अत्तराचे?
तुझ्यासवे बोलतो जरी मी, तुला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या नास्तिकास आता तुझ्यात अस्तित्व ईश्वराचे
आणि मक्ता आवडला.
मध्ये-मध्ये मोसमीच काही तरंग उठतात पावसाने
कुपात होतात मंडुकांना कृतार्थ आभास सागराचे
ः) हा शेरही आवडला.