नमस्कार गोळेसाहेब.
तुम्हाला सुनीत आवडल्याचे वाचून बरे वाटले. धन्यवाद.

---------

आता आपली सुचवणीसंबंधी-

सुनीतातील शेवटच्या दोन ओळी (१३ व १४) ह्या नोकरीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या मुलाची प्रिया म्हणते आहे. तेव्हा "जो त्यांचे करी वाटप" हेच इथे योग्य आहे.

९ व्या ओळीतील "पत्रे तू मजसी लिही प्रतिदिनी" हे  मुलगी म्हणते आहे. (त्या ओळीत तसा उल्लेखही आहे.)
१०,११,१२ ह्या ओळी मुलगा म्हणतो आहे. (हे तिथे स्पष्ट झालेले नसावे.)

सुनीतातील संदिग्धतेबद्दल क्षमस्व. पुन्हा कधी काव्यरचना केली (ह्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. कारण कविता हा माझा प्रांत नाही.) तर ती अधिक सुस्पष्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.

-मीरा