डाळ तांदुळ तैशा मेथ्या लालेलाल त्या भाजल्या
गर्ररा फिर्वुन चक्राला किती समरस तै केल्या
तेल उकळे झळाळा त्याला हिंग ह्ळद ती लावा
गर्म मसाल्याचा दर्वळ अर्ध्या नारळे वाढावा

कैरी ओली कच्च साली सह ती टाकली
पाणी घालुन पातळ मंद ऊकळी आणली
मीठ चवी पुर्ते नारळ अंदाजे घालावा
उडदा मेथीचा नैवेद्य देवा आता स्विकारावा