मी राधिका - धन्यवाद!

दुसरे म्हणजे, महिन्याच्या नावावरून आकाशाच्या भागाला नाव दिले हे किमान भारतीय खगोलशास्त्राच्या बाबतीत तरी चुकीचे विधान आहे, असे वाटते. आपले भारतीय महिने आहेत- चैत्र, वैशाख वगैरे. या महिन्यांची नावे त्या त्या नक्षत्रावरून ठेवली गेली आहेत. चित्रा - चैत्र. आणि चित्रावरूनच चैत्र आले चैत्रावरून चित्रा नाही असे कसे म्हणू शकता, असे विचारलेत तर उत्तर सोपे आहे. चित्रा या शब्दाचे चैत्र हे तद्धित रुप आहे. त्यावरून चित्रा हा शब्द आधीपासून अस्तित्त्वात होता व मग त्यावरून चैत्र हा शब्द बनवला गेला हे लक्षात येते.

खरे तर महिन्यांच्या नावावरून आकाशाच्या भागांची नावे असे न म्हणता आकाशाच्या प्रत्येक भागास एकेका महिन्याचे नाव दिले हे अधिक संयुक्तिक वाटल्याने तसे लिहिले आहे.
त्याहूनही महत्वाचे म्हणजे आकाशावरून महिना की महिन्यावरून आकाश हे तपशील जरी बाजूस ठेवले तरीही आकाशाच्या भागाचा आणि महिन्याचा (काळाचा) काही परस्परसंबंध असावा हा महत्वाचा विचार मांडला आहे. ...

असो - आपण जो नक्षत्रांचा संदर्भ दिलेला आहे त्यावरून मनांत आलेली काही शंका!

उदा. - चित्रावरून चैत्र येण्याचे नेमके प्रयोजन काय?

काही शंका जाणकारांना अगदीच बाळबोध वाटण्याची शक्यता आहे. तरीही विचारण्यामागील प्रामाणिक भावना लक्षात घ्यावी आणि मी राधिका किंवा इतरांनीही ज्ञानलालसा पुरवावी.