अभिनंदन नीलकांत. तुम्ही दोन्ही बाजू न चुकता मांडल्या आहेत. इथे माझीच बाजू खरी म्हणून हिरिरीने भांडणाऱ्या मंडळींमधे तुमचा हा प्रतिसाद सुखावणारा आहे.  अहो एका चर्चेत मी 'दोन्ही बाजू समजून घेऊन नीरक्षीरविवेक वापरावा' असे म्हटले होते, त्यावर 'माझा नीरक्षीरविवेक मीच बरोबर आहे असे सांगतो' असे बेजबाबदार उत्तर मला मिळाले होते. त्यानंतर अशा एकांगी चर्चेपासून कटाक्षाने दूर रहात आलो आहे. पण येथे तुमचे अभिनंदन केल्याशिवाय राहवत नाही.

आपण नरहर कुरूंदकरांची पुस्तके वाचली आहेत का? नसल्यास जरूर वाचा. आपणासारख्या समतोल विचाराच्या माणसाला नक्कीच आवडतील.

-विचक्षण