<<माझ्या मते ब्रिटिश भारत सोडून गेले ह्याचं कारण नक्कीच आर्थिक होतं, सामाजिक किंवा राजकीय किंवा भावनिक नक्कीच नव्हतं. यावर पुरेसा मसाला गोळा करूनच लिहीन. तोवर जरा वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर विचारांना योग्य गती मिळेल. धन्यवाद! >>
मंदार,
निश्चितच अर्थकारण महत्त्व्वाचे आहे. त्याचबरोबर समाजकारण आणि प्रशासकिय कारणेही आहेत. समाजकारण अशा अर्थाने कि बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे म्हणजे वाढत्या असुरक्षिततेच्या भावनेने चांगले प्रशासकिय अधिकारी तिथून इथे येउन रहाण्यास फ़ारसे उत्सुक नसावेत. मुळात आपण या लोकांना हवे तसे राबवू आणि चाबुक दाखवून काम करून घेउ ही परिस्थिति बदलली होती. सैन्य आधिच्या काळासारखे विश्वासार्ह राहीले नव्हते, ते स्वतंत्र्याच्या कार्यास अनूकूल होउ लागले होते. महायुद्धानंतर जागतिक समीकरणे झपाट्याने बदलत होती आणि बाहेरच्या पेक्षा घराकडे अधिक लक्ष देणे इंग्रजांना अगत्याचे झाले असावे. युद्ध काळात डोक्यावर घेतलेल्या नेत्याना इंग्रज जनतेने युद्धा नंतर नाकारले होते. अशा अवस्थेत एखाद्या दुरच्या देशातली सत्ता सांभाळणे हे जिकिरिचे आणि आर्थिक द्रुष्ट्या अकार्यक्षम ठरत होते.
आर्थिक चणचण, साधनांचा तुटवडा, वाढता कारभार, वाढती लोकसंख्या, भारताचा प्रचण्ड विस्तार, प्रत्येक सिमेवर नविन शत्रु, मुख्य म्हणजे युद्धात झालेली सक्षम अधिकार्यांची हानी आणि इंग्लण्डच्या राजा राणीचे घटते महत्त्व ही काही कारणे असु शकतात.
ही चर्चा फ़ार उद्बोधक ठरेल, विषय निवड्ल्याबद्दल अमितचे अभिनंदन.