वा वा चित्तोपंत!

गझल अगदी उत्तम आहे. प्रवाळ आणि शेवटचे तीन शेर फार फार आवडले.

मध्ये-मध्ये मोसमीच काही तरंग उठतात  पावसाने
कुपात होतात मंडुकांना कृतार्थ आभास सागराचे

नेमके भाष्य.

तुझ्यासवे बोलतो जरी मी, तुला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या नास्तिकास आता तुझ्यात अस्तित्व ईश्वराचे

अतिशय उंचीचा शेर.

तुझ्या नि माझ्या चुकामुकींचे कशास अक्षांश मोजतो मी?
कधीतरी छेद जायचे का समांतराला समांतराचे?

एकदम नवीकोरी कल्पना. पुन्हा पुन्हा वाचत आहोत हा टवटवीत शेर.

आपला
(ताज़ातवाना) प्रवासी