श्री चित्त,
मन ताजे तवाने झाले, गझल वाचुन, अभिनंदन! काही गोष्टी ज्यांचे आकलन झाले नाही त्या कृपया सांगाल का?
शेर क्र.१- कुणला उद्देशुन आहे? निसर्ग,प्रेयसी, क्षितीज? चंदनाचा देह, आणि केसराचे ओठ ह्या प्रतिमा अंबराला उद्देशुनच असाव्यात, किंवा अंबराच्या रुपात दर्शन होणाऱ्या अजुन कोणाला उद्देशुन?
शेर क्र.४-म्हणून संसार वादळाचा म्हणायला नेटकाच झाला ---म्हणजे पुढील ओळीत मी कारण शोधले, 'संसार वादळाचा म्हणायला नेटकाच का झाला' ह्याचे. पुढील ओळीत उल्लेख झालेली मजा कोणती? आणि मग नेटका झाला ह्याचे कारण?..मग मी असा विचार केला की कविला 'म्हणायचा नेटकाच झाला' असे तर म्हणायचे नाही ना?..एकुणशेराचा मतितार्थ- मी सुखी आहे असे  म्हणण्याचे सुद्धा धाडस करु शकत नाही, माझे हेशब्द ऐकुन ,न जाणो दुर्भाग्य माझ्या वाटेला आले तर' असा असावा असे वाटते.धन्यवाद!
मध्ये-मध्ये मोसमीच काही तरंग उठतात  पावसाने
मस्तचकुपात होतात मंडुकांना कृतार्थ आभास सागराच..एकदम सडेतोड शेर,
 प्रवाळ, अक्षांश दर्जेदारच !
-मानस६