नसे तुझा देह चंदनाचा, न हे तुझे ओठ केशराचे
पुसून जातात संधिकाली कधी कधी रंग मेकपाचे!
:-) ठीक आहे. (नाहीतरी इथे रंगाच्या थप्प्या हव्यात कोणाला?)
निमूट ऐकून घ्यावयाला कुणीतरी लाडका हवा ना?
रडून ती दाखवी स्वतः का असून काळीज पत्थराचे!
वाहवा! क्या बात है!!
तुझ्या नि माझ्या झटापटींच्या घडून गेल्या कितीक फेऱ्याहे भावले!
तुझ्यासवे बोलतो तरी मी, तिला कधी भेटलोच नाही
कबूल ह्या प्रेमिकास आता तुझ्यात अस्तित्व सायराचे
कधी कधी मांजरेच काही चढून तोऱ्यात जात होती
घरात झालेच माणसांना उगाच आभास वानराचे!
हे मात्र डोक्यावरून गेले.
एकंदरीत कविता आवडली. (एक तर बऱ्यापैकी सहज कळली - नाहीतर आमच्यासारख्यांना कवितेसाठी गाइडे लागतात - त्यातून छानच आहे.)
- टग्या.