नितीन

मला वाटतं माझा वरचा प्रतिसाद तुम्ही नीटसा वाचलेला दिसत नाही.  तांत्रिक दृष्ट्या तुम्ही सांगितलेला चमत्कार होणं कसं अशक्य आहे हे मी वरती स्पष्ट केलं आहे.  तुम्हाला ते कळलं नसलं तर तसं सांगा. परत कितीही वेळा ते समजावून सांगण्याची माझी तयारी आहे.  त्याचबरोबर  या संदर्भातलं कुठलंही आव्हान स्विकारायला मी तयार आहे असंही मी वरती सांगितलंय.  हे सगळं सोयीस्कर रीत्या बाजूला ठेवून आता तर तुम्ही सरळ सरळ पळपुटेपणा करताय, हे काही फारसं चांगलं नाही.  आव्हान द्यायला / स्विकारायला का घाबरताय?  तांत्रिक रित्या फोटोग्राफीतल्या चार गोष्टी तुम्ही मला शिकवणार असाल तर तसं सांगा.  पण तुमचं त्याही बाबतीतलं ज्ञान तोकडं दिसतंय.  पळपुटेपणा करण्यापेक्षा आणि लोकांच्या बुद्धीची कीव करण्यापेक्षा (तुमच्याकडे ती बरीच आहे असं समजतो) आव्हान द्या / स्विकारा. 

मिलिंद