अरे बापरे ! दोन दिवसात चर्चा फारच पुढे गेली आहे.

त्यात चमत्कारांना पाठिंबा असणाऱ्यांमध्ये माझेही नाव आलेले पाहिले.

चमत्कार, भोंदूपणा यावर मांडली गेलेली मते योग्य आहेत असे वाटते. तसेच अशा प्रकाराच्या मागे लागल्याने आपण तर योग्य ज्ञानापासून वंचित राहतोच पण यामुळे भोंदू लोकांचे सुद्धा फावते. या सर्वावर पूर्वीपासून-आजपर्यंत, अगदी तुकारामांपासून विवेकानंदांपर्यंत, सर्वांनीच कोरडे ओढले आहेत.

तसेच, व्यवहारामध्येच फक्त नव्हे, तर या तथाकथीत गोष्टी ज्या परमार्थाच्या प्रांतात येतात, तेथे सुद्धा अशीच सावधानता, विवेक आणि सारासार विचार ठेवून पुढे जावे असेच सर्वांनी सांगितले आहे. यासाठी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण प्रसिद्धच आहे.

लोकांना आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी 'चमत्कारांची' कास धरणाऱ्यांबद्दल मला कधीच सहानुभूती नाही. (नीतिन हे मत मी आपल्या उदाहरणाबाबत व्यक्त करत नाहीये. )

चर्चेला आता आलेले स्वरूप पाहता मला एक प्रश्न विचारावासा वाटतो.
अध्यात्मामध्ये प्रगत अशा अनेक सत्पुरुषांच्या चरित्रांमध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या लिखाणामध्ये बऱ्याच अद्भूत गोष्टींचे दाखले मिळतात. सर्वविद्वतजनमान्य अशा आणि जे स्वतः अतिशय पुरोगामी विचारांचे विचारवंत होते अशा लोकांच्या चरित्रातही असे दाखले पाहून मात्र, अद्भूत घटना घडतच नाहीत असे कसे म्हणावे ? हे मला कळेनासे होते.
(अशा लोकांपैकी काही जण पाहा,
रामकृष्ण - विवेकानंद,
जे. कृष्ण्मुर्ती,
योगी अरविंद,
गुरुदेव रानडे.)

आपल्या सर्वांचे मत जाणून घ्यायची इच्छा आहे.
आपला,
--लिखाळ.